नवी दिल्ली- परवानगीशिवाय व्हॉट्सअॅप ग्रुपवर अॅड करण्याच्या कटकटीतून तुमची सुटका होणार आहे. कारण व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी हा पर्याय वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिला आहे. विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या मोहिमेला गती आणली जात असताना व्हॉट्सअॅपने हा बदल केला आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर हा कुटुंब, मित्र, सहकारी, वर्गमित्र आणि इतरांना संपर्कात ठेवण्यासाठी होत आहे. या ग्रुपच्या वापराबाबत लोकांकडून फेसबुकने अनुभव जाणून घेतले. वैयक्तीक गोपनीयता देणारा पर्याय व्हॉट्सअॅपने सेटिंगमध्ये उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायातून ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे की नाही, हे वापरकर्त्याला ठरविता येणार आहे.
देशात व्हॉट्सअॅपचे २० कोटी वापरकर्ते आहेत. केंद्र सरकारने मॉब लिचिंगच्या घटनेनंतर फेसबुकसाठी कडक नियम लागू केले आहेत. त्यानंतर फेसबुकने वैयक्तीक गोपनीयता, अफवा टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.