सॅनफ्रान्सिस्को - ट्विटरवर सेलिब्रिटीसह वापरकर्त्यांना अनेकदा अनोळखी व्यक्तींकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. वापरकर्त्यांना त्यांच्या ट्विटला कोणी प्रतिक्रिया द्यायची, याचा पर्याय निवडता येणार आहे. त्यामुळे वापरकर्त्याला ट्विटवरील संवाद मर्यादित ठेवणे ठेवणे शक्य होणार आहे.
गेल्या वर्षापासून वापरकर्त्याला त्याच्या संवादावर नियंत्रण देण्यासाठी सुविधा देण्यावर काम सुरू होते, असे ट्विटरने म्हटले आहे.
हेही वाचा-फोर्स मोटर्सचे आकुर्डी, चाकणसह चेन्नईतील उत्पादन प्रकल्प सुरू होणार
वापरकर्त्याला सेटिंगमध्ये गेल्यानंतर तीन पर्याय मिळणार आहेत.
- प्रत्येकजणाला प्रतिक्रिया देणे शक्य असल्याचा पर्याय
- केवळ तुम्ही फॉलो करत असलेल्या व्यक्तींना प्रतिक्रिया देण्याचा पर्याय
- मेन्शन केलेल्या अकांऊटच्या व्यक्तिला प्रतिक्रिया देण्याची अनुमती
असे असले तरी जे व्यक्ती प्रतिक्रिया देवू शकणार नाहीत, त्यांना वापरकर्त्याचे ट्विट दिसू शकणार आहे. ते ट्विट रिट्विट करता येणार आहे. तसेच रिट्विट करून टिपण्णी करता येणार आहे.
हेही वाचा-फोर्स मोटर्सचे आकुर्डी, चाकणसह चेन्नईतील उत्पादन प्रकल्प सुरू होणार