महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

स्पूटनिक लशीचे ऑगस्टमध्ये भारतात सुरू होणार उत्पादन

रशियातील भारतीय राजदूत व्यंकटेश शर्मा म्हणाले, की जूनअखेर भारताला ५० लाख लशींचे डोस मिळणार आहेत. तर ऑगस्टमध्ये लशीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.

Sputnik vaccine
स्पूटनिक

By

Published : May 22, 2021, 3:25 PM IST

सॅनफ्रान्सिस्को- (रशिया) -देशात स्पूटनिक कोरोना लशीचे उत्पादन ऑगस्टपासून होण्याची शक्यता असल्याचे रशियातील भारतीय राजदूत बाला व्यंकटेश शर्मा यांनी सांगितले. यापूर्वीच रशियाने भारतात २ लाख लशींचे डोस निर्यात केल्याचेही शर्मा यांनी माहिती दिली.

रशियातील भारतीय राजदूत व्यंकटेश शर्मा म्हणाले, की भारताला १,५०,००० स्पूटनिक लशींचे डोस पुरविले आहेत. त्यानंतर अतिरिक्त ६०,००० लशींचे डोसही देण्यात आले आहेत. भारतामध्ये मे अखेर ३० लाख लशींचे डोस देण्यात येणार आहेत. जूनअखेर भारताला ५० लाख लशींचे डोस मिळणार आहेत. तर ऑगस्टमध्ये लशीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-ब्लॅक फंग्स : 'अॅम्फोटेरिसीन बी'चा तुटवडा कमी करण्याकरता केंद्राचे प्रयत्न - मनसुख मांडवीय

तीन टप्प्यात भारताला मिळणार ८५ कोटी लशींचे डोस

भारतामध्ये तीन टप्प्यात लशीचे उत्पादन होणार असल्याचेही भारतीय राजदूत शर्मा यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात संपूर्ण रशियामध्ये उत्पादन झालेल्या स्पूटनिकचा भारताला पुरवठा होणार आहे. हा टप्पा यापूर्वीच सुरू झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात आरडीआयएफकडून भारताला मोठ्या प्रमाणात लशींचा साठा पुरवठा केला जाणार आहे. ही लस वापरण्यासाठी असेल, पण विविध बाटल्यांमध्ये भारतामध्ये भरावी लागणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात रशियाकडून लस उत्पादनाचे तंत्रज्ञान भारतीय कंपन्यांना हस्तांतरित केले जाणार आहे. त्यानंतर या कंपन्या मोठ्या प्रमाणात लशीचे उत्पादन करू शकणार आहेत. या तिन्ही टप्प्यातून 85 कोटी स्पूटनिक लस भारताला मिळणार असल्याचे वर्मा यांनी नमूद केले.

हेही वाचा-केंद्राकडून साखरेच्या निर्यातीवरील अनुदानात प्रति टन २ हजारांची कपात

स्पूटनिक लाईट लसही मंजुरीच्या प्रतिक्षेत!

स्पूटनिक लाईट लशीलाही भारताकडून मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा राजदूत वर्मा यांनी व्यक्त केली. रशियानेही लाईट लशीलाही मंजुरी दिली आहे. मात्र, भारताकडून मंजुरी मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या लशीचा एकच डोस कोरोनापासून बचाव करण्यासाठी ७९.४ टक्के कार्यक्षम असल्याला रशियन संशोधन संस्था आरडीआयएफचा दावा आहे.

दरम्यान, कोरोनाचा उद्रेक देशभरात सुरू असताना नागरिकांना कोरोना लशीची प्रतिक्षा आहे. लशींचा पुरेसा साठा नसल्याने लसीकरण मोहिम संपूर्ण देशात रखडलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details