नवी दिल्ली - जेट एअरवेजची विमान सेवा बंद झाल्यानंतर कंपनीचे अनेक कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. अशा स्थितीत स्पाईसजेटने जेट एअरवेजला मोठा दिलासा दिला आहे. स्पाईसजेटने त्यांच्या ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देऊन मोठा दिलासा दिला आहे.
स्पाईसजेटने बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना दिली नोकरी
स्पाईसजेटने जेट एअरवेजचे ५०० पायलट, २०० तांत्रिक कर्मचारी आणि इतरांना नोकऱ्या दिल्या आहेत.
स्पाईसजेटने जेट एअरवेजचे ५०० पायलट, २०० तांत्रिक कर्मचारी आणि इतरांना नोकऱ्या दिल्या आहेत. आम्ही कंपनीचा विस्तार करत आहोत. दुर्दैवाने जेट एअरवेज कंपनी बंद झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना नोकरीत प्राधान्य देत असल्याची माहिती स्पाईसजेटचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी माहिती दिली. स्पाईसजेट कंपनी येत्या १५ दिवसांत नवी २७ विमाने घेणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
स्पाईसजेटचा देशातील विमान वाहतूक क्षेत्राच्या बाजारपेठेत १३.६ टक्के हिसा आहे. स्पाईसजेटकडे सध्या बोईंग ७३७ एस हे ४८ , बॉम्बार्डियर क्यू ४०० हे २७, एस आणि बी ७३७ हे एक अशी विमाने आहेत.