मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्नाटकमधील डेक्कन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधामुळे ग्राहकांना केवळ १ हजार रुपयापर्यंत रक्कम काढता येणार आहे. तसेच बँकेला नवीन कर्ज किंवा ठेवी घेता येणार नाहीत.
आरबीआयने निर्बंध लादल्यामुळे डेक्कन अर्बन बँकेला कोणताही नवीन व्यवसाय अथवा कर्ज देता येणार नाही. तसेच नव्याने ठेवी स्वीकारता येणार नाहीत. हे निर्बंध १९ फेब्रुवारीपासून सहा महिन्यांसाठी लागू असणार आहेत. बँकेची वित्तीय स्थिती लक्षात घेता हे निर्णय घेण्यात आले आहेत. बँकेच्या ग्राहकांना ठेव रकमेवर कर्ज घेता येणार आहे. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.