महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 24, 2021, 4:05 PM IST

ETV Bharat / business

अनिश्चिततेही देशामधील व्यावसायिकांना करियरबाबत आत्मविश्वास

लिंक्डइनने मनुष्यबळ विश्वास निर्देशांकबाबत सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणामधील बहुतांश मनुष्यबळाला महामारीची स्थिती, वाढते खर्च आणि सध्याच्या आर्थिक स्थितीत नोकऱ्यांच्या उपलब्धतेबाबत चिंता वाटत आहे.

Jobs
नोकऱ्या

नवी दिल्ली - कोरोनाच्या महामारीमुळे जगभरात अनिश्चितता आहे. असे असले तरी देशातील व्यावसायिकांना नोकऱ्या आणि भविष्यातील आर्थिकबाबत आत्मविश्वास वाटत असल्याचे एका सर्वेक्षणामधून दिसून आले आहे.

लिंक्डइनने मनुष्यबळ विश्वास निर्देशांकबाबत सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणामधील बहुतांश मनुष्यबळाला महामारीची स्थिती, वाढते खर्च आणि सध्याच्या आर्थिक स्थितीत नोकऱ्यांच्या उपलब्धतेबाबत चिंता वाटत आहे. लिंक्डइन लेबर मार्केड अपडेटच्या आकडेवारीनुसार गतवर्षी डिसेंबर २०२० मध्ये नोकरी भरतीचे प्रमाण १७ टक्क्यांपर्यंत घसरले होते. वर्षभरानंतही नोकऱ्यांमधील स्थिती चिंताजनक राहिली आहे.

हेही वाचा-ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांची बिटकॉईनमध्ये १७० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक

काय आहे सर्वेक्षणामधील माहिती?

  • लिंक्डइनने १ जानेवारी ते २९ जानेवारी २०२१ दरम्यान १,७५२ व्यावसायिकांकडून माहिती घेतली. या माहितीनुसार अनिश्चितता वाढत असतानाही ८० टक्के व्यावसायिकांनी कौशल्याच्या संधीबाबत आत्मविश्वास दाखविला आहे. तर ७९ टक्के व्यावसायिकांना त्यांच्या बायोडाटाबद्दल आत्मविश्वास आहे.
  • लिंक्डइनचे भारतीय व्यवस्थापक आशुतोष गुप्ता म्हणाले की, कौशल्य हे नवीन व्यावसायिकांचे चलन आहे. बहुतेक उद्योग हे घरातून काम करण्यावर भर देत आहे. वेगवेगळ्या पिढ्यांमधील व्यावसायिक हे भविष्यातील करियर सुरक्षित करण्यासाठी नवीन कौशल्य शिकविण्यावर अवलंबून राहिले आहेत.
  • कॉर्पोरेट सेवा, आरोग्यक्षेत्र, सॉफ्टवेअर आणि आयटी उद्योगांना त्यांच्या कर्मचाऱ्यांबाबत आत्मविश्वास आहे.

हेही वाचा-आनंद उपग्रहाचे प्रक्षेपण पिक्सेलकडून लांबणीवर

ABOUT THE AUTHOR

...view details