नवी दिल्ली - सलग तिसऱ्या दिवशी देशात पेट्रोलचे दर वाढले आहेत. यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. तर डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत.
दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत पेट्रोल १४ पैशांनी महागले आहे. तर चेन्नईत पेट्रोल १५ पैशांनी पेट्रोल महागले आहेत. गेल्या तीन दिवसात दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत पेट्रोलचे दर ४७ पैशांनी वाढले आहेत. तर चेन्नईत पेट्रोल हे गेल्या तीन दिवसात ५० पैशांनी महागले आहे.
इंडियन ऑईल वेबसाईटच्या आकडेवारीनुसार असे आहेत पेट्रोलचे दर (रुपयामध्ये) -
- दिल्ली - ७३.७७
- कोलकाता-७६.४७
- मुंबई - ७९.४४
- चेन्नई - ७६.६८
हेही वाचा-बिल गेट्स पुन्हा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ; अॅमेझॉनच्या संस्थापकाला टाकले मागे