महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 25, 2021, 9:30 PM IST

ETV Bharat / business

कच्च्या तेलाच्या उत्पादक देशांनी किमती वाढविल्याने पेट्रोल-डिझेल महाग

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. त्याबाबत बोलताना पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, अधिक नफा कमविण्यासाठी कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या देशांनी त्यांच्या उत्पादनाच्या किमती वाढविण्यास सुरुवात केली आहे.

Dharmendra Pradhan
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

लखनौ- कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या देशांनी कच्च्या तेलाच्या किमती वाढविल्या आहेत. त्यामुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती वाढल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. त्याबाबत बोलताना पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, अधिक नफा कमविण्यासाठी कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या देशांनी त्यांच्या उत्पादनाच्या किमती वाढविण्यास सुरुवात केली आहे. या देशांना कच्च्या तेलाचे दर वाढवू नये, अशी तेल उत्पादक देशांना विनंती करण्यात आली आहे. त्यांनी कृत्रिमरित्या कच्च्या तेलाचे दर वाढविले आहेत. जर ग्राहक देशांवर परिणाम होत असले तर कच्च्या तेलाच्या उत्पादक देशांनी किमती वाढवू नयेत, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा-एमएसएमई क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन -आरबीआय गव्हर्नर

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. या परिस्थितीत बदल होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा-सार्वजनिक बँकांचे खासगीकरण झाल्यास ८० लाख कोटी रुपये धोक्यात

काँग्रेसच्या टीकेला पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले प्रत्युत्तर

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना नुकतेच धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, राजस्थान व महाराष्ट्रमध्ये इंधनावर जास्तीत जास्त कर आहेत, हे सोनियाजी यांना माहित असायला हवे. कोरोनाच्या काळात राज्य व केंद्र सरकारचे उत्पन्न कमी झाले आहे. रोजगार वाढविण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर ९ फेब्रुवारीपासून वाढत आहेत. या १२ दिवसांमध्ये पेट्रोल दिल्लीत प्रति लिटर ३.६३ रुपयांनी महागले आहे. तर डिझेल प्रति लिटर ३.८४ रुपयांनी महागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details