महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

ऑक्सिजनकरता धावाधाव : भारत १० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्सची करणार आयात

केंद्र सरकारमधील अधिकाऱ्याने सांगितले, की अमेरिकेबरोबर एअर बबल्समधून सॅनफ्रान्सिस्कोमधून दिल्लीत पुढील आठवड्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणण्यात येणार आहेत. फिलिप्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॅनियल मॅझॉन यांनी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरची जगभरात मागणी वाढल्याने उत्पादन वाढविले आहे.

oxygen concentrators
ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स

By

Published : Apr 24, 2021, 6:51 PM IST

नवी दिल्ली -कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत असताना केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार विदेशातून 10 हजारांहून अधिक ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आयात करणार आहे.

देशातील ऑक्सिजनच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आयात करण्यासाठी विविध खासगी कंपन्यांबरोबर करार केले आहेत. केंद्र सरकारमधील अधिकाऱ्याने सांगितले, की अमेरिकेबरोबर एअर बबल्समधून सॅनफ्रान्सिस्कोमधून दिल्लीत पुढील आठवड्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणण्यात येणार आहेत.

हेही वाचा-थेट दिल्लीहून विमानाने अहमदनगरकरिता तीनशे रेमडेसेवीर पोहोच; खासदार सुजय विखेंचे प्रयत्न

फिलिप्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॅनियल मॅझॉन यांनी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरची जगभरात मागणी वाढल्याने उत्पादन वाढविले आहे. लोकांचे आणखीन प्राण वाचविण्यासाठी भारतामध्ये लवकरच ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा-'भाजपाकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न'

दिल्लीसह देशाच्या विविध राज्यांच ऑक्सिजनचा तुटवडा-

दिल्लीमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे. अशा स्थितीत रुग्णालयांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ऑक्सिजनची कमतरता आणि ऑक्सिजन भेटण्याबाबत अनिश्चितता असताना कुठूनही मदत मिळत नाही. त्यामुळे रुग्णालयांना दाखल करणे आम्हाला नाईलाजाने थांबवावे लागत आहे. रुग्णांना सुट्टी द्यावी लागत असल्याचेही दिल्लीमधील खासगी रुग्णालयाने न्यायालयात सांगितले. दरम्यान,

हेही वाचा-कोल्हापुर- चंद्रकांत पाटलांचे कोल्हापूरातील कर्तृत्व काय? राजेश क्षीरसागरांचा टोला

कोरोना उपचाराशी निगडित वस्तुंना कोणताही वेळ न दवडता परवानगी देण्याचे आदेश केंद्र सरकारने सीमा शुल्क विभागाला दिले आहेत. शुक्रवारीच्या आकडेवारीनुसार देशात नवीन 3.46 लाख कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 2,624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details