मुंबई - शुक्रवारी शेअर बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्स ३५१.३२ अंशांनी कोसळला. तसेच, एनएसई निफ्टीही ४९.५५ अंशांनी घसरलेला दिसून आला. सकाळच्या सत्रामध्ये सेन्सेक्स २७,९१३.९९ अंशांवर स्थिरावला होता, तर निफ्टी ८,२०४.२५ अंशावर स्थिरावला.
गुरूवारी रामनवमी असल्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे बंद होते. त्यानंतर आज शुक्रवारी सकाळी शेअर बाजार उघडताच त्यात ही घसरण दिसून आली. रामनवमीनिमित्ताने धातू, सराफ बाजारांसह घाऊक वस्तू बाजारही गुरूवारी बंद होते. यासोबतच, परकीय चलन आणि कमोडिटी फ्युचर्स बाजारामध्येही कोणताही व्यवहार सुरू नव्हता.