महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 9, 2021, 7:59 PM IST

ETV Bharat / business

महाराष्ट्रातील २ हजार १४ गावे अजूनही वेगवान इंटरनेटपासून वंचित

ग्रामीण भागात वेगवान इंटरनेटची सुविधा ही केंद्र सरकार आणि टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स (टीएसपी) यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. देशात अद्याप ३७,४३९ गावांमध्ये वेगवान इंटरनेटची सेवा असलेली ३जी व ४जी सेवा नसल्याची संसदेमध्ये माहिती देण्यात आली.

इंटरनेट
इंटरनेट

नवी दिल्ली - ग्रामीण भागात वेगवान इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतनेट प्रकल्प राबविण्यात येत आहे. या योजनेमधून २.५ लाख ग्रामपंचायतींना ब्राँडबँडच्या पायाभूत सुविधा देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील २ हजार १४ गावे अजूनही वेगवान इंटरनेटपासून वंचित आहेत.

ग्रामीण भागात वेगवान इंटरनेटची सुविधा ही केंद्र सरकार आणि टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स (टीएसपी) यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. देशात अद्याप ३७,४३९ गावांमध्ये वेगवान इंटरनेटची सेवा असलेली ३जी व ४जी सेवा नसल्याची संसदेमध्ये माहिती देण्यात आली.

हेही वाचा-नवीन उच्चांक गाठून शेअर बाजार निर्देशांकात दिवसाखेर अंशत: घसरण

  • गुजरातमधील ७७५ गावांमध्ये ३जी अथवा ४जी मोबाईल इंटनेरट सुविधा नाही. या गावांना योजनेमधून टप्प्याटप्प्याने ब्रॉडबँड उपलब्ध देण्यात येणार आहे. तर १७ हजार ८४३ गावांमध्ये वेगवान इंटरनेटची सेवा आहे.
  • २०११ च्या लोकसंख्येप्रमाणे महाराष्ट्रामधील ४० हजार ९५९ गावांमध्ये वेगवान ३जी व ४जी इंटरनेटची सुविधा आहे. तर अद्याप २ हजार १४ गावे ही अजूनही इंटरनेटपासून वंचित आहेत.

हेही वाचा-इंधनात दरवाढीचा पुन्हा भडका; दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ८७ रुपयांहून अधिक

दरम्यान, केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भारतनेट ऑप्टिकल फायबर नेटवर्कमधून २.५ लाख ग्रामपंचायती जोडण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. भारतनेट सेवेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व गावांमध्ये वायफायची मोफत सेवा देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. देशभरातील गावांमधून देण्यात येणारी वायफाय सेवा ही मार्च २०२० पर्यंत मोफत देण्यात येण्याचे उद्दिष्ट मात्र यंदा हुकण्याची चिन्हे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details