मुंबई -भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) कोरोना महामारीमुळे विम्याचे दावे दाखल करताना अनेक नियम शिथील केले आहेत. एलआयसीने विमा दावे दाखल करण्यासाठी प्रक्रिया अधिक सोपी आणि अडचणीविरहित केली आहे.
सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीने रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर विमा दावे पूर्ण करण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. मृत्यू प्रमाणपत्राला पर्याय म्हणून डिस्चार्ज समरी, ईएसआय, संरक्षण दल, कॉर्पोरेट हॉस्पिटल आदी यंत्रणांकडून देण्यात येणारे मृत्यू प्रमाणपत्र स्वीकारण्यात येत आहेत. तर काही प्रकरणात नगरपरिषदांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्रही स्वीकारले जाणार आहे.
हेही वाचा-गोपनीयतेचे धोरण अपडेट नसेल तरी व्हॉट्सअपचे अकाउंट राहणार सुरू
- एलआयसीकडून व्हिडिओ कॉलद्वारा लाईफ सर्टिफिकेट घेतेले जात आहे. एलआयसीने दाव्यांच्या प्रतिपूर्तीसाठी वेबसाईटवर ऑनलाईन एनईएफटी रेकॉर्ड क्रिएशन आणि सबमिशन पर्यायही दिला आहे.