हैदराबाद – बुद्धीचा गणेशदेवता मानला जाणाऱ्या गणेशाकडून वित्तीय नियोजनाचा प्रतिकात्मक संदेश मिळतो. गणेश हा संकटमोचक म्हणून त्याची स्तुती केली जाते. त्याचमुळे अनेक उद्योग आणि कंपन्या त्यांच्या नव्या व्यवसायाची मुहर्तमेढ करण्यापूर्वी गणेशाचे पूजन करतात. तर जाणून घ्या, गणेशाकडून वित्तीय नियोजनाचे मार्गदर्शन कसे मिळते!
गजानन म्हणजे हत्तीचे मस्तक असलेला, व्रक्रतुंड म्हणजे सोंड असलेला, लंबोदर म्हणजे मोठे पोट असलेल्या गणेशाचे पूजन केले जाते. गणेशाची संकटमोचक म्हणून स्तुती केली जाते. तर अशा गणेशाकडून वित्तीय व्यवस्थापनाचा संदेशही मिळवू शकता. त्यासाठी काही व्यावहारिक उपयुक्त ठरणारे संदेश जाणून घेऊ…
शिका आणि गुंतवणूक करा
गणेशाचे मस्तक मोठे असते. त्यामधून काळजीपूर्वक शिकण्याचा धडा आपल्याला मिळतो. उदाहरणार्थ जर तुम्हाला गुंतवणुकीचे चांगले नियोजन करायचे असेल तर त्यासाठी नवीन ज्ञान मिळविणे आणि नवीन शिकण्याची गरज असते. त्यामुळे चांगले निरीक्षण ठेवणे, गुंतवणुकीचे फायदे व तोट्यांचा विचार करावा लागतो. तरच गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.
एकाग्रता ही महत्त्वाची किल्ली
गणेशाचे डोळे लहान मात्र तीक्ष्ण आहेत. त्यामधून एकाग्र आणि दक्ष राहण्याचा संदेश मिळतो. गुंतवणुकदाराने वित्तीय नियोजनात प्रत्येक लहानसहान गोष्ट पाहणे आवश्यक असते. मग तो विमा असो की गुंतवणूक करण्यात येणाऱ्या कंपनीचा पोर्टफोलिओ! तसे केल्याने येणाऱ्या अडचणी टाळणे शक्य होते.