महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'कोरोना कवच'चा ग्रुप विमा योजनेत समावेश; इरडाची कंपन्यांना परवानगी

विमा कंपन्यांना कोरोना कवच विमा ग्रुपमध्ये राबविण्याची परवानगी मिळाल्याने अनेक ग्राहकांना विमा संरक्षण मिळणे शक्य होणार आहे. खासगी कंपन्यांसह इतर कंपन्यांना कर्मचाऱ्यांसाठी कोरोना कवच ही विमा योजना देणे शक्य होणार आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Jul 22, 2020, 4:11 PM IST

नवी दिल्ली – कोरोना महामारीच्या संकटात भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने (इरडा) दिलासादायक निर्णय घेतला आहे. 'कोरोना कवच' हा विमा ग्रुप विमा योजनेत समावेश करण्याची इरडाने विमा कंपन्यांना परवानगी दिली आहे.

विमा कंपन्यांना कोरोना कवच विमा ग्रुपमध्ये राबविण्याची परवानगी मिळाल्याने अनेक ग्राहकांना विमा संरक्षण मिळणे शक्य होणार आहे. खासगी कंपन्यांसह इतर कंपन्यांना कर्मचाऱ्यांसाठी कोरोना कवच ही विमा योजना देणे शक्य होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर इरडाने 'कोरोना कवच' विमा योजना सुरू करण्याची 30 विमा कंपन्यांना परवानगी दिली आहे. ही योजना 10 जुलैनंतर सुरू झाल्यानंतर अनेक ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

ग्रुप विमा योजनेने उत्पादन, सेवा, एमएसएमई, लॉजिस्टिक्स क्षेत्र, स्थलांतरित मजुरांना मानसिक शांतता मिळू शकणार आहे. तसेच त्यांच्या कुटुंबांना विमा संरक्षण मिळणार असल्याचे इरडाने म्हटले आहे. कोरोना युद्धात आघाडीवर काम करणाऱ्यांनाही कोरोना कवच मिळू शकणार आहे.

कोरोना कवच योजनेत ग्राहकाला तीन ते साडेतीन, सहा ते सहा महिने आणि नऊ ते साडेनऊ महिन्यांसाठी विमा हप्ता भरावा लागतो. त्यामधून ग्राहकाला 50 हजार ते 5 लाखापर्यंत विमा हप्त्याची रक्कम मिळते.

ABOUT THE AUTHOR

...view details