महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जाणून घ्या, कोण आहेत अर्थशास्त्राचे नोबेल मिळविणारे अभिजित बॅनर्जी

अभिजित बॅनर्जी यांचा मुंबईमध्ये १९६१ मध्ये जन्म झाला. त्यांना 'जागतिक गरिबी दूर हटविण्यासाठी प्रयोगात्मक दृष्टीकोन' या  विषयावर अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाला आहे.

अभिजित बॅनर्जी

By

Published : Oct 14, 2019, 5:11 PM IST

स्टॉकहॉल्म - मूळ भारतीय वंशाचे असलेले अभिजित बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल मिळाला आहे. हा नोबेल त्यांना पत्नी इस्थर डफ्लो आणि अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांच्यासमवेत संयुक्तपणे मिळाला आहे. बॅनर्जी हे अमेरिकेमधील एमआयटीच्या फोर्ड फाउंडेशन इंटरनॅशनलमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहेत.

अभिजित बॅनर्जी यांचा मुंबईमध्ये १९६१ मध्ये जन्म झाला. त्यांना 'जागतिक गरिबी दूर हटविण्यासाठी प्रयोगात्मक दृष्टीकोन' या विषयावर अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाला आहे. ५८ वर्षीय बॅनर्जी यांनी हॉवर्ड विद्यापीठातून १९८८ मध्ये पीएच. डी. मिळविली आहे. कोलकाता विद्यापीठात तसेच दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधून त्यांनी शिक्षण घेतले आहे.

त्यांनी २००३ मध्ये पत्नीसमवेत अब्दुल लतिफ जमिल पॉव्हर्टी अ‌ॅक्शनची स्थापना केली होती. त्यांची पत्नी डफ्लो यादेखील एमआयटीमध्ये प्राध्यापिका आहेत. त्यांनी अनेक अर्थविषयक लेख आणि चार पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये गोल्डमॅन सॅच्स बिझनेस बुक ऑफ द इयर ठरलेल्या पुअर 'इकॉनॉमिक्स' या पुस्तकाचाही समावेश आहे.

हेही वाचा-अभिमानास्पद ! भारताच्या अभिजित बॅनर्जींना अर्थशास्त्राचे 'नोबेल'

बॅनर्जी यांनी तीन पुस्तकांचे संपादन केले आहे. तसेच दोन डॉक्युमेंटरीचे संपादन केले आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या वरिष्ठ समितीमध्ये २०१५ मध्ये विकास मोहिमेवर काम केले आहे.

दरम्यान अभिजित बॅनर्जी हे एमआयटी लॅबचे संचालक असल्याचेही एमआयटीच्या वेबसाईटमध्ये म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details