वॉशिंग्टन -भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाचे सचिव विजय गोखले हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान अमेरिकेने भारतात सहा अणुउर्जा प्रकल्प उभा करण्यासाठी संमती दर्शविली आहे. दोन्ही देशात नागरी आण्विक सहकार्य वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. भारताला अणुउर्जा पुरवठादारांच्या गटात सहभागी करण्याबाबात अमेरिकेने सर्मथन असल्याने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
भारत-अमेरिकेदरम्यान रणनिती असलेल्या सुरक्षा संवादाच्या ९ वी फेरीदरम्यान दोन्ही देशांनी संयुक्तपणे निर्णयांची घोषणा केली. यावेळी उपाध्यक्ष म्हणून परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय गोखले आणि अमेरिकेचे अँड्रिया थॉम्पसन हे होते.
दोन्ही देशात सरंक्षण रणनीती बळकट करण्यासाठी आणि नागरी आण्विक उर्जा वाढविण्यासाठी बांधील असल्याचे संयुक्त निवदेनात म्हटले आहे.भारत हा ४८ सदस्यीय आण्विक पुरवठादारांच्या गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वाचा दावेदार आहे. यामध्ये भारताचा समावेश करण्यासाठी समर्थन असल्याचे अमेरिकेने बुधवारी पुन्हा एकदा जाहीर केले आहे. चीनने विरोध दर्शविल्याने भारताला अजून एनएसजीचे सदस्यत्व मिळू शकले नाही. जागतिक सुरक्षेची आव्हाने आणि दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे मिळण्यापासून रोखणे याबाबत दोन्ही देशात चर्चा करण्यात आली आहे. अंतराळातील धोके तसेच दोन्ही देशांमध्ये सहकार्यातून उपलब्ध होणाऱ्या विविध संधीबाबतही चर्चा करण्यात आली आहे.