नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने १.४५ लाख कोटी रुपये ८९ लाख करदात्यांना परताव्यापोटी चालू आर्थिक वर्षात दिली आहे. ही माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयाने दिली आहे. यामध्ये वैयक्तिक प्राप्तिकर परताव्याचा (पीआयटी) समावेश आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने १,४५,८१९ कोटी रुपये ८९.२९ लाख करदात्यांना १ एप्रिल २०२० ते ८ ऑक्टोबर २०२० दरम्यान दिले आहेत. याबाबतचे ट्विट केंद्रीय वित्तमंत्रालयाने केले आहे.
हेही वाचा-सॅटेलाईटवर आधारित बीएसएनएलची आयओटी डिव्हाईस सेवा लाँच
डिसेंबरपर्यंत १.४० लाख कोटी रुपयांचा परतावा-
प्राप्तिकर विभागाने गेल्या आठ महिन्यांत १.४० लाख कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे. हा परतावा देशातील ५९.६८ लाख कोटी करदात्यांना १ डिसेंबरपर्यंत देण्यात आला आहे.
- प्राप्तिकर विभागाने वैयक्तिक करावर ३८ हजार १०५ कोटींचा परतावा दिला आहे.
- कॉर्पोरेट कर परताव्यावर १.०२ लाख कोटींचा परतावा दिला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) १ एप्रिल २०२० ते १ डिसेंबर २०२० पर्यंत ५९.६८ लाख कोटी करदात्यांना १ लाख ४० हजार २१० कोटी परतावा दिला आहे.
- प्राप्तिकर परताव्यापोटी ५७ लाख ६८ हजार ९२६ प्रकरणात ३८ हजार १०५ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. तर १ लाख ९९ हजार १६५ प्रकरणात १ लाख २ हजार १०५ कोटींचा परतावा दिला आहे. ही माहिती प्राप्तिकर विभागाने ट्विट करून दिली आहे.
हेही वाचा-कोरोना लस वाहतुकीकरता स्पाईसजेटचा ओम लॉजिस्टिक्सबरोबर करार