नवी दिल्ली - कोरोनाचे संकट असताना केंद्र सरकारने औषधांच्या निर्यातीवर निर्बंध शिथील केले आहेत. पॅरासिटिमॉलपासून तयार करण्यात आलेल्या संमिश्रांच्या (फॉर्म्युलेशन) निर्यातीवरील बंदी सरकारने उठविली आहे.
केंद्र सरकारने पॅरासिटिमॉल तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रियाशील घटकद्रव्यांच्या (एपीआय) निर्यातीवरील बंदी कायम ठेवली आहे. केंद्र सरकारने मार्च ३ पासून २६ औषधी घटकद्रव्यांच्या निर्यातीवर बंदी लागू केली आहे.