नवी दिल्ली - तुमचे पॅन कार्ड -आधार कार्ड हे संलग्न (लिंक) नसेल तर चिंता करू नको. कारण, महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पॅन कार्ड-आधार कार्ड हे लिंक करण्याची 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
पॅन-आधारला लिंक करण्याची मुदतवाढ दिल्याची माहिती केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटवर दिली आहे. करदात्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय राज्य अर्थमंत्र्यांनी माहिती दिली आहे.
मार्च महिन्यात करदात्यांच्या प्रतिनिधी करणाऱ्या गटांनी प्राप्तिकर विभागाला सादरीकरण (प्रेझेंटेशन) करत पॅन कार्ड हे आधारला लिंक करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गटना तशी मागणी केली होती. त्यामुळे प्राप्तिकर विभागाने आधार-पॅन हे लिंक करण्याची 30 जून 2021 पर्यंत मुदतवाढ दिली होती.
हेही वाचा-कोरोनाच्या लाटेत दिल्ली सरकारकडून गरजेपेक्षा चारपटीने ऑक्सिजनची मागणी - अहवाल
करदात्यांना पॅनकार्ड हे आधारला जोडण्याशिवाय पर्याय नाही-
जर आधारला पॅन कार्ड जोडणी नसेल तर, पॅन कार्ड सुरू राहणार नाही, असे प्राप्तिकर विभागाने गतवर्षी मार्चमध्ये स्पष्ट केले आहे. पॅन आणि आणि आधार जोडणी करणे बंधनकारक आहे. हे तुम्ही बायोमेट्रिक आधार पडताळणीनेही करू शकता. तसेच एनएसडीएल आणि युटीआयटीएसएलच्या पॅन सेवा केंद्रातूनही जोडणी करणे शक्य आहे. अशी जोडणी भविष्यासाठी फायद्याचे असल्याचेही प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर परताव्यासाठी पॅनकार्ड हे आधारला जोडण्यासाठी बंधनकारक असल्याचा निकाल दिला होता. त्यामुळे करदात्यांना पॅनकार्ड हे आधारला जोडण्याशिवाय पर्याय नाही.