महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेकरिता फेसबुकची मोहिम; अभिनेत्री नेहा धुपियाही सहभागी

लहान मुलांबाबतचा आक्षेपार्ह कंटेन्ट असेल तर १०९८ ला तुम्ही कॉल करू शकता. तसेच चाईल्डलाईन इंडिया फाऊंडेशनलाही कळवू शकता. याविषयी सविस्तर माहिती वाचू शकता.

Facebook launches new initiative
अभिनेत्री नेहा धुपिया

By

Published : Jun 16, 2021, 3:46 PM IST

नवी दिल्ली- समाज माध्यमातील बलाढ्य कंपनी फेसबुकने लोकांना लहान मुलांशी निगडीत आक्षेपार्ह कंटेन्ट काढण्याकरिता नवीन मोहिम सुरू केली आहे. लहान मुलांशी निगडीत आक्षेपार्ह कंटेन्ट शेअर करण्याचे फेसबुककडून आवाहनी करण्यात आले आहे.

फेसबुकने रिपोर्ट इट, डोन्ट शेअर इट ही मोहिम आरंभ इंडिया इनिशिटिव्ह, सायबर पीस फांउडेशन आणि अर्फान या संस्थांबरोबर सुरू केली आहे. या मोहिमेत लहान मुलांशी निगडीत आक्षेपार्ह कंटेन्ट पोस्ट व शेअर केल्याचे दुष्परिणाम हे अॅनिमिटेड व्हिडिओमधून दाखविण्यात आले आहेत.

हेही वाचा-ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांचे निधन; वयाच्या 97व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

फेसबुकचे असे आहेत प्रयत्न
फेसबुक इंडियाच्या धोरण विभागाच्या प्रमुख मधू सिरोधी म्हणाल्या, की आम्ही फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील वातावरण अधिक सुरक्षित आणि उपयुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आम्ही लोकांमध्ये आणि तंत्रज्ञानामध्ये मोठी गुंतवणूक करत आहोत. लोकांपर्यंत आक्षेपार्ह कंटेन्ट पोहोचण्याआधी काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी लोकांमध्ये योग्य वर्तणूक आणि जनजागृती करण्यात येत आहे.

हेही वाचा-Maratha Reservation : ...तर नाशिकमध्ये आनंदोत्सव साजरा करू - संभाजीराजे छत्रपती

ही कम्युनिटी मुलांच्या संगोपनाबद्दल आहे चर्चेत

फेसबुकने जनजागृतीसाठी बॉलिवुड अभिनेत्री नेहा धुपिया हिच्याबरोबर भागीदारी केली आहे. नेहा धुपिया ही फ्रीडम टू फीड ही इन्टाग्रामवर कम्युनिटी चालविते. त्यामध्ये महिलांना स्तनपान आणि अवतीभोवताली असलेल्या आव्हानांसोबत बोलण्याकरता प्रोत्साहित केले जाते. तसेच या कम्युनिटीमधील सदस्य मुलांच्या संगोपनाबद्दलही चर्चा करत असतात.


हेही वाचाशेतकऱ्यांनो पेरणीसाठी चांगल्या पावसाची आणखी वाट पाहा - कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भाले

काय म्हणाली नेहा धुपिया?
अभिनेत्री नेहा धुपियाने मुलांबाबतच्या आक्षेपार्ह कंटेन्टबद्दल मत व्यक्त केले. नेही धुपिया म्हणाली, की मी तसे घडलेले पाहिले आहे. ते बरोबर नाही. आपण अनेकदा कोणताही विचार न करता कंटेन्ट शेअर करत असतो. जरी त्यामध्ये मुलांबाबत आक्षेपार्ह कंटेन्ट असला तरी...त्याचा मुलांवर मोठा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मी फेसबुकबरोबर भागीदारी केली आहे. मला त्याबाबत जनजागृती करायची आहे. जेव्हा तुम्हाला आक्षेपार्ह कंटेन्ट दिसेल तेव्हा कृपया शेअर करू नका, तर रिपोर्ट करा.

असा कंटेन्ट करा रिपोर्ट
लहान मुलांबाबतचा आक्षेपार्ह कंटेन्ट असेल तर १०९८ ला तुम्ही कॉल करू शकता. तसेच चाईल्डलाईन इंडिया फाऊंडेशनलाही कळवू शकता. जर तुम्हाला फेसबुकवरील फॅमिली अॅपमध्ये तसा कंटेन्ट आढळला तर तुम्ही Fb.me/online child protection या लिंकवर रिपोर्ट करू शकता.

ABOUT THE AUTHOR

...view details