महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोनाने थिम पार्कचा व्यवसाय ठप्प; डिस्ने ३२ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढणार

कोरोनाच्या परिणामासह सध्याचे वातावरण बदल होत आहे. व्यवसाय चालविणे कठीण होत असताना कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती डिस्नेने युएस सिक्युरिटीज आणि एक्सचेंजला (एसईसी) दिली आहे.

By

Published : Nov 27, 2020, 4:03 PM IST

थिम पार्क
थिम पार्क

सॅनफ्रान्सिस्को- जगभरातील पर्यटकांना डिस्नेच्या थीम पार्कचे आकर्षण असते. मात्र, कोरोना महामारीमुळे डिस्नेचा थीम पार्क व्यवसाय ठप्प आहे. या संकटामुळे डिस्नेने २०२१ मध्ये पहिल्या तिमाहीत ३२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे नियोजन केले आहे. कोरोना महामारीने व्यवसायावर परिणाम झाल्याने डिस्नेने हा निर्णय घेतला आहे.

डिस्नेने सप्टेंबरमध्ये २८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. हे कर्मचारी अर्धवेळ काम करणारे आहेत. डिस्नेने बुधवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीप्रमाणे कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या चार हजारांनी वाढविली आहे.

हेही वाचा-टीसीएसचे संस्थापक एफ. सी. कोहली यांचे ९६ व्या वर्षी निधन

कोरोनाच्या परिणामासह सध्याचे वातावरण बदल होत आहे. व्यवसाय चालविणे कठीण होत असताना कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती डिस्नेने युएस सिक्युरिटीज आणि एक्सचेंजला (एसईसी) दिली आहे. कोरोना आणि कोरोनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनामुळे थिम पार्कच्या व्यवसायावर अनेक पद्धतीने परिणाम झाला आहे.

हेही वाचा-धक्कादायक! बँकांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या 27 फरार आर्थिक गुन्हेगारांपैकी फक्त दोघांवर कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details