मुंबई– काही उद्योगपतींनी त्यांच्या कंपन्यांची खासगी (प्रायव्हेट) कंपनी म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंपन्यांची खासगी म्हणून नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या निधी आणि भांडवली रचनेवर परिणाम होईल, असे फिच या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे.
शेअर बाजाराच्या यादीतून बाहेर पडणार्या कंपन्यांच्या निधीवर होणार मोठा परिणाम
एचटी ग्लोबल आयटी सोल्युशन्स आणि वेदांत रिसोर्स कंपनीने त्यांच्या मालकीच्या कंपन्या शेअर बाजारातील नोंदणीतून काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये हेक्सावेयर टेक्नो आणि वेदांत कंपनीचा समावेश आहे.
एचटी ग्लोबल आयटी सोल्युशन्स आणि वेदांत रिसोर्स कंपनीने त्यांच्या मालकीच्या कंपन्या शेअर बाजारातील नोंदणीतून काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये हेक्सावेयर टेक्नो आणि वेदांत कंपनीचा समावेश आहे. अदानी पॉवरकडून वेदांत कंपनीला शेअर बाजाराच्या सूचीबद्ध यादीतून काढण्याबाबत आढावा घेण्यात येत आहे.
सरकारने शेअर बाजारमधून कंपन्यांची नोंदणी काढण्यासाठी नियम शिथील केले आहेत. त्यानंतर गेल्या काही आठवड्यात शेअर बाजारात घसरण झाली आहे. शेअर बाजारमधून कंपनीचे नाव काढले, तर कंपनीवर उद्योगपतींना समभागधारकापेक्षा अधिक जास्त नियंत्रण मिळवता येते. तसेच कॉर्पोरेटला ग्रुपच्या गुंतागुंतीची रचना व्यवस्थित करता येणार आहे. हे समभागधारकांच्या हस्तक्षेपाशिवाय शक्य होणार आहे.