कोलकाता- कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने पर्यटन क्षेत्राचे नुकसान होते. त्यामुळे सरकारने हस्तक्षेप करावा आणि दिलासा द्यावा, अशी मागणी टीएएआयच्या प्रतिनिधींनी केली. या मागण्यांसाठी ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (टीएएआय) प्रतिनिधींनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांची आज भेट घेतली.
कोरोनाच्या प्रसारानंतर सुमारे ७० ते ८० टक्के तिकिट बुकिंग रद्द करण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीमधून सावरण्यासाठी सरकारने पर्यटन, प्रवास आणि आदरातिथ्य उद्योगाला पुढील १२ महिन्यांसाठी जीएसटी माफ करावा, अशी मागणी टीएएआयचे अध्यक्ष ज्योती मायाल यांनी केली. पर्यटन उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या पगारी करण्यासाठी मनरेगाचा निधी वापरावा, अशी संघटनेने सरकाला विनंती केली आहे. तसेच कर्ज आणि व्याजावर सवलत द्यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.