महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

टाळेबंदीत मद्यपींची कमी दर्जाच्या दारूला पसंती; 'हे' आहे कारण

बहुतांश ग्राहकांनी ई-कॉमर्स कंपन्यांकडून ऑनलाईन दारू खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मे आणि जूनमध्ये दारू विक्रीत घसरण झाल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Jul 20, 2020, 2:49 PM IST

नवी दिल्ली – कोरोना महामारीत अर्थव्यवस्था ढासळल्याने काही राज्यांनी दारूवरील उपकर वाढविला आहे. दारूचे दर वाढल्याने मद्यपींनी कमी दर्जाच्या दारूला पसंती देण्यास सुरुवात केल्याचे एका सर्वेक्षणामधून दिसून आले आहे.

लोकल सर्कल्स कंपनीने टाळेबंदीत मद्यपींकडून दारूच्या खरेदीबाबत सर्वेक्षण केले. यामध्ये राज्यांच्या दारू विक्रीत घसरण झाल्याचे दिसून आले आहे. दारूची कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) वाढल्याने दारू खरेदी करणारे ग्राहक हे कमी प्रमाणात दारू खरेदी करत आहेत. त्याचा परिणाम म्हणून राज्यांच्या महसुलात घसरण होत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

बहुतांश ग्राहकांनी ई-कॉमर्स कंपन्यांकडून ऑनलाईन दारू खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मे आणि जूनमध्ये दारू विक्रीत घसरण झाल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. दारू हे राज्यांना महसूल मिळण्याचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. मात्र, कोरोना महामारी आणि टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे कर संकलनात घट झाल्याने राज्यांनी दारूवरील उपकर वाढविला आहे. यामध्ये सर्वाधिक उपकर तेलंगाणा, पश्चिम बंगाल आणि राजस्थानने वाढविला आहे.

लोकल सर्व्हेने तेलंगाणा, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये सर्वेक्षण केले. यामध्ये एकूण 25 हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. बजेटच्या प्रमाणात खरेदी करता यावी, याकरता कमी दर्जाच्या दारूच्या खरेदी करण्यावर विचार करत असल्याचे अनेक ग्राहकांनी सांगितले. यामध्ये तेलंगाणामधील 55 टक्के ग्राहकांनी, पश्चिम बंगालमधील 50 टक्के ग्राहकांनी तर राजस्थानमधील कमी दर्जाची दारू खरेदी करणार असल्याचे सांगितले.

दिल्ली सरकारने दारूवर अतिरिक्त 70 टक्के उपकर लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दारूच्या विक्रीत घसरण होत असल्याने दिल्ली सरकारने उपकर मागे घेण्याचा निर्णय त्वरित मागे घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details