महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पीपीईसह मास्कच्या निर्यातीवरील निर्बंध कायम

केंद्र सरकारने एनबीआर ग्लोज, वैद्यकीय गॉगल आणि फेस शिल्डच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. सर्जिकल ड्रेप्स, एक्स-रे गाऊन्स यांना निर्यातीच्या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Jul 22, 2020, 12:23 PM IST

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या संकटात केंद्र सरकारने वैद्यकीय साधनांच्या निर्यातीबाबत धोरणात सुधारणा केली आहे. सर्व वैद्यकीय, बिगर वैद्यकीय मास्क व पीपीईच्या निर्यातीवरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने एनबीआर ग्लोज, वैद्यकीय गॉगल आणि फेस शिल्डच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. सर्जिकल ड्रेप्स, एक्स-रे गाऊन्स यांना निर्यातीच्या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

केंद्र सरकारने अधिसूचना क्रमांक 14 मध्ये सुधारणा करत एक्स-रे गाऊनसह इतर वैद्यकीय साधनांना निर्यातमधून वगळले आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी बिगर वैद्यकीय मास्कच्या निर्यातीला परवानगी दिली होती. परंतु देशातील कोरोनाचे संकट वाढत असताना पुन्हा एकदा अशा मास्कच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details