हैदराबाद - शहर सायबर गुन्हे पोलिसांनी समाज माध्यम व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि टिकटॉकवर गुन्हा दाखल केला आहे. समाज माध्यमांमधून देशविरोधी माहिती आणि व्हिडिओ पसरत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
हैदराबाद सायबर गुन्हेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रघुवीर म्हणाले, एस. एस. श्रीशैलम यांनी न्यायालयात दाखल केलेली तक्रार मिळाली आहे. या प्रकरणात श्रीशैलम यांची तक्रार न्यायालयामार्फत मिळाल्याने व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि टिकटॉक विरोधात गुन्हा नोंदविला आहे. या माध्यमांवर देशात बंदी नसल्याने पोलीस कारवाई करू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, जाणीवपूर्वक द्वेषमूलक संदेश पसरविणाऱ्या विरोधात कारवाई करणे शक्य आहे. पोलीस तपास करत आहेत. जर तक्रारदाराचा चुकीचा दावा आढळला तर, आम्ही तक्रार निकालात काढू. हे प्रकरण आठवडाभरापूर्वी मिळाल्याची त्यांनी माहिती दिली.
हेही वाचा-कोरोना संसर्ग महागात ; दलाल स्ट्रीटवरील गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी पाण्यात