सॅनफ्रान्सिस्को– कोरोना महामारीतही अॅपल कंपनीने तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी केली आहे. या दमदार कामगिरीनंतर अॅपलने जगात सर्वाधिक मूल्य असलेल्या अॅराम्को कंपनीला मागे टाकले आहे.
अॅपलने तिमाहीत चांगली कामगिरी केल्याने अॅपलचे शेअर हे 10.47 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यानंतर अॅपल ही जगातील सर्वाधिक मूल्य असलेली कंपनी ठरली आहे. यापूर्वी सौदी अरेबियाची अॅराम्को ही सर्वात मूल्य असलेली कंपनी होती. सौदी अॅम्को कंपनीचे मूल्य हे 1.76 लाख कोटी डॉलर आहे.
विक्रीची दुकाने बंद होवूनही उत्पन्नात वाढ -
कोरोना महामारीत अॅपल कंपनीला जगभरातील अनेक विक्रीची दुकाने बंद करावी लागली आहेत. चालू वर्षात अॅपल कंपनीचे शेअर हे 44 टक्क्यांनी वधारले आहेत. अॅपल कंपनीने चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाही ते तिसऱ्या तिमाहीत जून 27 पर्यंत 59.7 अब्ज डॉलरचा महसूल मिळाला आहे. हा महसूल मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीहून 11 टक्क्यांनी अधिक आहे.