महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आत्मनिर्भर भारत: आयफोन १२ चे देशात घेण्यात येणार उत्पादन

आयफोन १२ श्रेणीला देशात चांगला प्रतिसाद मिळाला असतानाच कंपनीने त्याचे देशात उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील ग्राहकांनी आयफोन १२ चे उत्पादन करताना अभिमान वाटत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

By

Published : Mar 9, 2021, 8:01 PM IST

आयफोन १२
Apple

नवी दिल्ली - देशामध्ये मेक इन इंडियाला चालना देणारी महत्त्वाची बातमी आहे. अ‌ॅपलचा महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणस्नेही प्रकल्प असलेल्या आयफोन १२ स्मार्टफोनचे देशात उत्पादन होणार आहे.

आयफोन १२ श्रेणीला देशात चांगला प्रतिसाद मिळाला असतानाच कंपनीने त्याचे देशात उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील ग्राहकांनी आयफोन १२ चे उत्पादन करताना अभिमान वाटत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-छोट्या गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याचे उच्च न्यायालयाचे एनएसईएलला आदेश

  • कंपनी ही उत्कृष्ट उत्पादने आणि सेवा करण्यासाठी बांधील आहे. हे करताना आम्हाला आनंद होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
  • देशात ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत सणादरम्यान आयफोनला ग्राहकांनी चांगली पसंती दर्शविल्याचे सायबरमीडिया रिसर्चने (सीएमआर) म्हटले आहे.
  • वर्ष २०२० मध्ये अ‌ॅपलच्या व्यवसायात ६० टक्के वाढ झाली आहे.
  • अॅपलने देशात पहिल्यांता आयफोन एसईचे २०१७ मध्ये उत्पादन सुरू केले होते. त्यानंतर आयफोन एक्सआर, आयफोन ११ आणि आयफोन १२ चे उत्पादन घेण्यात येत आहे.
  • प्रिमीयमच्या श्रेणीत अ‌ॅपलची भारतात सॅमसंग आणि वनप्लेसबरोबर स्पर्धा आहे. भारतीय बाजारपेठेत हिस्सा वाढविण्यासाठी अ‌ॅपल सातत्याने प्रयत्न करत आहे.
  • अ‌ॅपलची भारतामधली निर्यात ही ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० च्या तिमाहीत मागील तिमाहीच्या तुलनेत १७१ पटीने वाढली आहे.
  • २०२० मध्ये कंपनीचा वृद्धीदर हा २०१९ च्या तुलनेत ९३ पटीने अधिक होता.
  • दरम्यान, आयफोन १२ मध्ये संपूर्णपणे पुर्नप्रक्रिया केलेल्या कच्च्या मालाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये नवीन कॅमेरा, टॅप्टिक इंजिन, मॅगसेफ अशा साधनांचा समावेश आहे.

हेही वाचा-शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५८४ अंशाने वधारला; खासगी बँकांचे शेअर तेजीत

काय म्हणाले होतेअ‌ॅपलचे सीईओ?

अ‌ॅपलचे सीईओ टीम कुक २८ जानेवारी २०२० ला म्हणाले की, भारत असा देशापैकी आहे, की ज्या देशातील बाजापपेठेत अ‌ॅपलचा हिस्सा कमी आहे. व्यवसाय वाढल्याने आम्ही भविष्याबाबत आशावादी आहोत. गेल्या तिमाहीत पहिल्यांदाच ऑनलाईन स्टोअर सुरू झाले आहे. भविष्यात रिटेल स्टोअरही सुरू करणार आहोत. हा खूप मोठा उपक्रम असणार आहे. तसेच वितरणाचे जाळेही विकसित करणार आहोत.

ABOUT THE AUTHOR

...view details