न्यूयॉर्क - कोरोनाच्या महामारीमुळे अमेरिकेतील लाखो नागरिकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर याचवेळी अब्जाधीशांच्या संपत्तीत एकूण ४३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या अॅमझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांच्या संपत्तीत ३४.६ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांची संपत्ती २५ अब्ज डॉलरने वाढली आहे.
अमेरिकेत सर्वात श्रीमंत असलेले पाच अब्जाधीश जेफ बेझोस, मार्क झुकेरबर्ग, वॉरेन बफेट आणि ऑरेकलचे लॅरी एलिसन यांच्या संपत्ती ७५.५ अब्ज डॉलरने म्हणजे एकूण १९ टक्क्यांनी वाढली आहे. अमेरिकन फॉर टॅक्स फेअरनेस (एटीएफ) आणि इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजच्या (आयपीएस) माहितीनुसार अमेरिकेचे अब्जाधीश आर्थिक बाबतीत खूप प्रगती करत आहेत. प्रत्यक्षात कोरोना महामारीमुळे अमेरिका दोन महिने बंद होती.
असमानतेबाबत बोलताना आयपीएस कार्यक्रमाचे संचालक चक बिलियन्स म्हणाले, की जगभरात महामारी असताना अब्जाधीश हे संपत्तीत त्याग करत नसल्याचे दिसून येत आहे.