महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

देशातील सर्वात मोठ्या 2,400 कर्जबुडव्यांची यादी होणार जाहीर

देशातील बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्याचा 51 वा वर्धापन दिन 19 जुलैला आम्ही साजरे करत आहोत. या दिवशी कर्जबुडव्यांची यादी आम्ही जाहीर करणार आहोत. अशी माहिती बँक कर्मचारी संघटनेचे महासचिव व्यंकटचलम यांनी दिली.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Jul 15, 2020, 9:51 PM IST

नवी दिल्ली - अखिल भारतीय बॅंक कर्मचारी संघटना लवकरच देशातील 2, 400 कर्जबुडव्यांची यादी जाहीर करणार आहे. या कर्ज बडव्यांनी सुमारे 1 लाख 40 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचे कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.

देशातील बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्याचा 51 वा वर्धापन दिन 19 जुलैला आम्ही साजरे करत आहोत. या दिवशी कर्जबुडव्यांची यादी आम्ही जाहीर करणार आहोत. अशी माहिती बँक कर्मचारी संघटनेचे महासचिव व्यंकटचलम यांनी दिली. पुढे ते म्हणाले, की 2019 अखेर कर्ज बुडण्याचे प्रमाण 7 लाख 39 हजार 541 कोटी रुपये होते.

19 जुलैला बँक कर्मचारी संघटनेच्या फेसबुक पेजवर वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती तसेच पोस्टर प्रदर्शित करण्यात येणार आहे. बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्याने आज खासगी बँकाकडून 40 टक्के कर्ज देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यासारख्या बड्या उद्योगपतींनी सरकारी बँकांना कोट्यवधींचा चुना लावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details