नवी दिल्ली -भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर चालू वर्षात ९ टक्क्यांनी घसरणार असल्याचा अंदाज एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) वर्तविला आहे. कोरोना महामारीचा आर्थिक चलनवलनावर आणि देशातील ग्राहकांच्या भावनांवर परिणाम होणार आहे. त्याचाच अर्थव्यवस्थेला फटका बसणार असल्याचे एडीबीने म्हटले आहे.
एशियन डेव्हलपमेंट बँकेने पुढील आर्थिक वर्षाबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. एडीबीने आउटलूक (एडीओ) २०२० अपडेट या अहवालात म्हटले की, वर्ष २०२१-२१ मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर मोठ्या प्रमाणात सावरण्याची शक्यता आहे. मोबिलिटी आणि वाहतूक चलनवलन पूर्ववत सुरू झाल्यानंतर पुढील आर्थिक वर्षात देशाचा सकल उत्पादन (जीडीपी) हा ८ टक्के होईल, असा अंदाज आहे.