नवी दिल्ली- क्रिकेटच्या मैदानावर १९८० आणि ९० च्या दशकात मोठ्या शहारातील खेळाडूंचा बोलबाला असायचा. आता मात्र, छोट्या शहरातून चांगले क्रिकेटपटू येण्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे या खेळात नाव कमावणे खूपच अवघड झाले असल्याचे मत माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले आहे.
क्रिकेटमध्ये नाव कमावणे झाले अवघड - वीरेंद्र सेहवाग
सेहवाग म्हणाला, क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. काही लोक याकडे करिअर म्हणून पाहत आहेत.
वीरेंद्र सेहवाग
सेहवाग म्हणाला की, क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. काही लोक याकडे करिअर म्हणून पाहत आहेत. त्यामुळे या खेळात नाव कमावणे अवघड झाले आहे. यात केवळ चांगले राहून चालत नाही. तुमच्याकडे कौशल्य असावे लागते आणि ते कौशल्य सामन्यात चांगले प्रदर्शनकरून दाखवावे लागते.
TAGGED:
वीरेंद्र सेहवाग