मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने १२ मे'ला मतदान करणार असल्याची माहिती त्याच्या इंस्टाग्रामवर दिली आहे. त्याने इंस्टाग्रामवर त्याच्या मतदान ओळखपत्राचा फोटोदेखील पोस्ट केला आहे.
या मतदान ओळखपत्रात विराट आणि त्याच्या वडिलाचे नाव दिसत आहे. विराट हा हरियाणाचा मतदाता आहे. मतदान ओळखपत्रावर म.न.सी सुखचैन मार्ग डीएलएल फेस १ गुडगाव तालुका गुडगाव जिल्हा गुडगाव असा पत्ता दिसत आहे.
विराट कोहलीला मुंबई येथील मतदार यादीत नाव नोंदवायचे होते. पण त्यासाठी त्याला निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्याची गरज होती. ३० मार्च पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख होती. ती त्याला नियमित वेळेत करता आली नाही. त्याची पत्नी अनुष्का शर्माचे मुंबई येथील मतदार यादीत नाव आहे.
देशाच्या पंतप्रधानानी १३ मार्च रोजी त्यांच्या ट्विटवर अंकाउटवरुन मतदान करण्याचे आव्हान केले होते. मोदींनी कर्णधार कोहली, एम.एस.धोनी, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग या लोकांना मतदानाविषयी जागरुकता करण्याचे आव्हान केले होते.
मुंबईत लोकसभेसाठी उद्या २९ एप्रिलला मतदान होणार आहे तर दिल्ली गुडगाव येथे १२ मे रोजी मतदान होईल. हैदराबाद येथे आयपीएलचा सामनादेखील याच दिवशी होणार आहे.