लखनऊ - उत्तर प्रदेशमधील जौनपूरमध्ये शुक्रवारी जमीनच्या वादावरून दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीमध्ये दहा ते बारा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी सोनारी आणि अमरा या गावातल्या दोन गटात हाणामारी झाली असून त्यात सहा जण जखमी झाले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
जमिनीच्या वादातून जौनपूरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
या दोन्ही गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमीन वाटपाच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता. या दोन्ही गटांध्ये शुक्रवारी जोरदार वादावादी झाली. या वादानंतर झालेल्या भांडणाला गंभीर वळण लागले. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगड आणि विटांच्या सहाय्याने हल्ला केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमीन वाटपाच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता. या दोन्ही गटांध्ये शुक्रवारी जोरदार वादावादी झाली. या वादानंतर झालेल्या भांडणाला गंभीर वळण लागले. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगड आणि विटांच्या सहाय्याने हल्ला केला.
दरम्यान, शुक्रवारी अमर या खेड्यातील एक गट सोनारी गावाजवळून जात असताना ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकी प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.