मुंबई- भारताचा माजी कर्णधार आणि 'द वॉल' म्हणून प्रसिध्द असलेल्या राहुल द्रविडच्या खांद्यावर नवी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. राहुल सध्या १९ वर्षाखालील आणि भारत 'अ' संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहतोय. या दोन्ही संघात त्याने बरेच बदल करून आश्वासक कामगिरी केल्याने बीसीसीआय त्याला नवी जबाबदारी देण्याच्या विचारात आहे.
'द वॉल'च्या खांद्यावर येऊ शकते नवी जबाबदारी, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत वर्णी लागण्याची शक्यता
पृथ्वी शॉ, शुभमन गिल आणि मयंक अगरवाल सारखे प्रतिभाशाली क्रिकेटपटू घडविण्यात राहुलाचा मोठा वाटा आहे.
बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा पीढीला प्रशिक्षण देणे आणि युवा प्रतिभा शक्तीचा शोध घेण्याची जबाबदारी राहुलच्या खांद्यावर देण्यात येणार आहे. त्याच्या पदाचे नाव अजून घोषित करण्यात आलेले नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ हजारहून अधिक धावा करणारा राहुल क्रिकेट विश्वात 'द वॉल' नावाने प्रसिध्द आहे. निवृत्तीनंतर तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत काम करत आहे. पृथ्वी शॉ, शुभमन गिल आणि मयंक अगरवाल सारखे प्रतिभाशाली क्रिकेटपटू घडविण्यात राहुलाचा मोठा वाटा आहे.