लाहोर - खराब फॉर्मात असलेला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याला पाकिस्तानच्या विश्वकरंडक संघातून वगळण्यात आले आहे. विश्वकरंडकाच्या संघात आमिरला स्थान न दिल्याने पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले. आमिरला संघात स्थान न दिल्याने आपण विश्वकरंडकही जिंकू शकत नसल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली आहे.
पाकिस्तानी क्रिकेट फॅन्सची प्रतिक्रिया
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला हरविण्यात आमिरचा मोठा वाटा होता. त्या सामन्यानंतर आमिर १४ सामने खेळला असून त्याला बळी मिळवण्यासाठी तरसावे लागत होते. या सामन्यात केवळ ९२.६० च्या सरासरीने त्याला ५ गडी बाद करता आले.
त्यानंतरच्या सलग ६ सामन्यात आमिरला एकही गडी बाद करता आला नाही. त्याच्या जागी पीएसएलमध्ये धमाका करणारा आणि १५० किमी वेगाने गोलंदाजी करणारा युवा गोलंदाज मोहम्मद हसनैन याला संघात स्थान देण्यात आले.
मोहम्मद हसनैन हा १५० किमी वेगाने गोलंदाजी करतो. अचूक मारा, योग्य बाउन्सर, परफेक्ट यॉर्कर ही या गोलंदाजाची वैशिष्ट्ये आहेत. पाकिस्तामधील हैदराबादच्या गल्लीत मोठा झालेला हा गोलंदाज आज पाककडून विश्वकरंडकाच्या संघात खेळणार आहे. शोएब अख्तर, मोहम्मद समी आणि वकार युनूस या गोलंदाजांचे व्हिडिओ पाहून गोलंदाजी शिकला आहे.
नुकत्याच झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याने १७.५८ च्या सरासरीने १२ गडी बाद केले आहेत. अंतिम सामन्यात ३ गडी बाद करत सामानावीरचा किताब पटकाविला.