महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

अल्लीपूर हत्या प्रकरण: करणी केली म्हणून मी त्याला मारले, आरोपीची कबुली

मृत गजानन आडे याच्याशी 15 दिवसापूर्वी शेतीसंबंधी वाद झाला होता, त्याने माझी पत्नी आणि मुलाला करणी केली म्हणून 16 जूनला आडे याला त्याच्या शेतात लाकडी काठीने जबर मारहाण करून त्याची हत्या केल्याची कबुली कुमरे याने दिली.

Criminal kumre
Criminal kumre

By

Published : Jul 20, 2020, 8:13 PM IST

वर्धा - अल्लीपूर स्टेशन अंतर्गत शेतशिवारात गजानन आडे नावाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक तपासात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे मृत आडे यांच्या पत्नी कुसुम आडे यांच्या माहितीवरून पोलिसांनी देविदास मारोती कुमरे याला ताब्यात घेतले होते. पोलिसी हिसका देताच, आडे याने माझी पत्नी आणि मुलाला करणी केली म्हणून मी त्याला मारून टाकले, अशी कबुली कुमरे याने दिली आहे.

अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत सोनेगाव खुनकर येथील गजानन आडे (वय 60) हे रोजप्रमाणे जागलीला शेतात गेले होते. मात्र दुसऱ्या दिवशी शेतातून घरी न परातल्याने त्यांची पत्नी कुसुम यांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी आडे हे मृतावस्थेत शेतात पडून होते. यावेळी अल्लीपूर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. यात आडे यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्या.

त्यानंतर पोलिसांनी आडे यांच्या पत्नीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे देविदास मारोती कुमरे याला ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, मी काही केले नसल्याचे कुमरे याने सांगितले. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने पोलिसी हिसका दिल्यानंतर, मृतक गजानन आडे याच्याशी 15 दिवसापूर्वी शेतीसंबंधी वाद झाला होता, त्याने माझी पत्नी आणि मुलाला करणी केली म्हणून 16 जूनला आडे याला त्याच्या शेतात लाकडी काठीने जबर मारहाण करून त्याची हत्या केल्याची कबुली कुमरे यांनी दिली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्ष महेंद्र इंगळे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे, पोलीस कर्मचारी गजानन लामसे, नरेंद्र डहाके, संतोष दरगुडे यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यात जादूटोण्यासंबंधी घटनांमध्ये वाढ होत आहे. यातील बरेच प्रकरण पोलिसांकडे पोहोचत नाही. यातले काही प्रकरण सुटतात, मात्र काही प्रकरणांचा शेवट हा हत्या अशा क्रूर कृत्याने होतो. आजही करणी करून कोणाला त्रास दिला जाऊ शकतो, असा समज पाहायला मिळतो. मानसिक आजारावर योग्य औषधोपचार न करता बरेचदा मांत्रिकाकडे नेण्याचे प्रकार घडतात. यामुळे जादूटोण्याविरोधी कायदा हा घरा घरात पोहोचणे गरजेचे आहे. शिवाय पोलीस अशी अनेक प्रकरणे गांभिर्याने घेत नसल्याचा आरोप अ.भा.अ.नि.सचे युवा शाखेचे महाराष्ट्र राज्य संघटक पंकज वंजारे यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details