महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

पुण्यातील धक्कादायक प्रकार..! नातीला अपशब्द वापरल्याच्या रागातून मुलाकडून वडिलांचा खून

नातीला अपशब्द वापरल्याच्या रागातून मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना पुण्यातील पौड पोलीस ठाण्यांतर्गत घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 22, 2020, 9:29 PM IST

पुणे -नातीला अपशब्द वापरल्याच्या रागातून मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना मुळशी तालुक्यातील चिखलगावात घडली. रागाच्या भरात मुलाने वडिलांचे डोके भिंतीवर आपटून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तालुक्यातील चिखलगावात सोमवारी (21 सप्टेंबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

मधुकर सदाशिव फाले (वय 55) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. पौड पोलिसांनी याप्रकरणी मृत व्यक्तीचा मुलगा जयंत मधुकर फाले (वय 31) याला अटक केली आहे. आरोपी मुलाची आई शैलजा मधुकर फाले (वय 47) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फाले कुटुंबीय मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील साधना व्हिलेज येथे राहतात. घटनेच्या दिवशी मयत मधुकर फाले यांनी स्वतः च्या नातील अपशब्द वापरले होते. यामुळे राग आल्याने आरोपी जयंत याने वडिलांना 'आता मी तुला जिवंत सोडणार नाही' असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांचे डोके पकडून भिंतीवर जोरजोरात मारले. यामध्ये डोक्याला जबर जखम झाल्यामुळे मधुकर फाले यांचा मृत्यू झाला. पौड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलाला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक धुमाळ करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details