लाहोर- पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याने ३७ चेंडूत विक्रमी अविस्मरणीय शतक ठोकले होते. आफ्रिदीने या विक्रमावर त्याने १८ वर्ष सत्ता गाजविली. त्याचे हे शतक भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या बॅटने ठोकल्याचा आफ्रिदीने आपल्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रातून सांगितले आहे. न्यूझीलंडच्या कोरी अॅडरसनने २०१४ साली हा विक्रम मोडीत काढला.
आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात सांगितले की, सचिनची बॅट पाकिस्तनाचा खेळाडू वकार युनिस याच्याकडे दिली होती. सियालकोट येथे चांगल्या बॅट तयार करून मिळतात, त्यामुळे सचिनला त्याच्या त्या बॅटसारखीच बॅट तयार करून हवी होती. त्यामुळे सचिनने ती बॅट वकारला दिली होती. पण ती बॅट सियालकोटला नेण्याआधी वकारणे ती बॅट मला दिली आणि त्या बॅटने स्फोटक खेळी करत ३७ चेंडूत शतक ठोकले.