महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

...अखेर परभणीतील 'तो' लाचखोर पोलीस बडतर्फ; पोलीस अधीक्षकांचे आदेश

अशा प्रकरणात साधारणपणे दोषी व्यक्तीला निलंबित करण्याची प्रक्रिया होत असते. त्यानंतर असे लोक काही दिवसातच पुन्हा कामावर देखील रुजू होतात. विशेष पोलीस दलात हा प्रकार नेहमीच घडतो. मात्र, परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी लाचखोर पाटील याला थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश बजावले.

By

Published : Jun 18, 2020, 7:15 PM IST

Gangakhed police
Gangakhed police

परभणी- एखाद्या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्याने लाच घेतल्यानंतर तो अनेकवेळा आठ-दहा दिवसांत पुन्हा रुजू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेषत: पोलीस दलात हा प्रकार नेहमीच पाहायला मिळतो. मात्र, परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी तीनच दिवसांपूर्वी गंगाखेड येथे प्रत्यक्ष लाच स्वीकारताना अटक झालेल्या पोलीस हवालदाराला थेट बडतर्फ करून लाचखोरीला आळा घालण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

या प्रकरणातील गंगाखेड पोलीस ठाण्यात कौडगाव येथील इलेक्ट्रिक काम करणाऱ्या तक्रारदाराच्या कुटुंबीयांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण मिटवू, असे आश्वासन देऊन पोलीस हवालदार सुरेश बाजीराव पाटील याने तक्ररारदारास 1 हजार रुपयांची लाच मागितली. 15 जून रोजी दुपारी पाटील यांनी संबंधितांकडून 1 हजार रुपयाची लाच स्विकारली. याप्रकरणात लाच स्विकारताना तो रंगेहाथ पकडला गेला. गंगाखेड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला लगेचच अटकही करण्यात आली.

मात्र, अशा प्रकरणात साधारणपणे दोषी व्यक्तीला निलंबित करण्याची प्रक्रिया होत असते. त्यानंतर असे लोक काही दिवसातच पुन्हा कामावर देखील रुजू होतात. विशेष पोलीस दलात हा प्रकार नेहमीच घडतो. मात्र, परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी लाचखोरांना अद्दल घडावी, असा निर्णय घेतला. केवळ तिसऱ्याच दिवशी लाचखोर पाटील याला थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश बजावले. त्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details