पॅरिस- बहारीन देशाचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी जी ७ परिषदेसाठी फ्रान्सला रवाना झाले आहेत. फ्रान्समधील बैरिट्झ येथे जी ७ ( ग्रुप ७) समूह देशांची बैठक होणार आहे. २५ आणि २६ ऑगस्ट या दोन दिवशी जी ७ देशांची बैठक चालणार आहे.
जी ७ परिषदेसाठी पंतप्रधान मोदी फ्रान्सला रवाना
फ्रान्समधील बैरिट्झ येथे जी ७ गट देशांची बैठक होणार आहे. २५ आणि २६ ऑगस्ट या दोन दिवशी जी ७ देशांची बैठक चालणार आहे.
मोदी
जगातील अतिप्रगत अर्थव्यवस्था असलेल्या देशांची जी ७ ही संघटना आहे. यामध्ये कॅनडा, फ्रान्स, अमेरिका, इटली, जर्मनी, ब्रिटन आणि जपान या देशांचा समावेश आहे. या ७ राष्ट्रांकडे ५८ टक्के जागतिक पत आहे. तसेच या ७ देशांचे जागतिक पातळीवर राष्ट्रीय उत्पादन ४० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
फ्रान्स येथील बैरिट्झ येथे जी ७ बैठक होणार आहे. पर्यावरण, हवामान, तंत्रज्ञान या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.