नांदेड - दिवसभरात नांदेडमध्ये फक्त एका नव्या कोरोनाबाधित रूग्णाची नोंद झाली आहे. शाहूनगर परिसरातील 41 वर्षे वयाच्या एका पुरुष बाधिताचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. तर मुखेड कोविड केअर सेंटर येथील 2 बाधित व्यक्ती आणि पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील 1 बाधित अशा एकूण तीन रूग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत 193 कोरोनाबाधितांपैकी 134 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून उर्वरीत 50 रूग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंगळवारी (दि.9 जुन) प्राप्त झालेल्या एकुण 30 अहवालांपैकी 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 193 एवढी झाली आहे. उपचार सुरु असलेल्या 3 बाधितांपैकी 65 वर्षे वयाची 1 स्त्री, अनुक्रमे 65 व 74 वर्षे वयाच्या दोन बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 9 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 11 बाधित रूग्णांवर, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 38, माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर येथे एका रूग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. मंगळवारी 79 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल बुधवारी सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे
सर्वेक्षण - 1 लाख 43 हजार 723
घेतलेले स्वॅब 4 हजार 579
निगेटिव्ह अहवाल- 4 हजार 43
मंगळवार (9 जून) पॉझिटिव्ह अहवाल संख्या -1,
एकुण पॉझिटिव्ह रूग्ण - 193,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 176,