मुंबई - महाराष्ट्र राज्याचा ५९ वा स्थापना दिवस मुंबईतील शिवाजी पार्क येथे साजरा करण्यात आला. यावेळी राज्यापाल विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. राज्याला विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, राज्याच्या वर्धापनदिनी राज्यपालांचे आवाहन
राज्यपाल म्हणाले, की महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. हे देशातील सर्वाधिक साक्षरता असणाऱया राज्यांपैकी आहे. इथली भौगोलिक स्थिती चांगली आहे. राज्याचा विकास दिवसेंदिवस जोमाने होत आहे. देशातील आघाडीच्या राज्यापैकी महाराष्ट्र आहे.
राज्यपाल म्हणाले, की महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. हे देशातील सर्वाधिक साक्षरता असणाऱया राज्यांपैकी आहे. इथली भौगोलिक स्थिती चांगली आहे. राज्याचा विकास दिवसेंदिवस जोमाने होत आहे. देशातील आघाडीच्या राज्यापैकी महाराष्ट्र आहे. तत्पूर्वी, राज्यपालांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातली राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आयुक्त अजॉय मेहता, केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते.