नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरात ९५ जागांसाठी १६,०० उमेदवार रिंगणात आहेत. यात महाराष्ट्रातील १० मतदार संघांचा समावेश आहे. तमिळनाडूतील लोकसभेच्या ३९ पैकी ३८ मतदारसंघांसह विधानसभेच्या १८ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक आयोगाने बुधवारीच रद्द केली. तसेच त्रिपुरातील एका जागेवरील मतदानही लांबणीवर टाकण्यात आले आहे. सकाळी ७ वाजल्यापासून देशात सर्व ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे.
Live Updates:
३.०० PM - पश्चिम बंगालमध्ये ३ वाजेपर्यंत जवळपास ७१.३२ टक्के मतदान झाले आहे. तर, बिहारमध्ये जवळपास ५२.०२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
२.३० PM - लोकसभेच्या ९५ जागांसाठी देशातील १ हजार ६४४ उमेदवार रिंगणात.
२:०० PM - पश्चिम बंगालमधील चोपरा येथे तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांदरम्यान वादावादी. ईव्हीएम मशीनची मोडतोड.
१:०० PM - फत्तेपूर सिकरी येथील मंगोली काला येथील ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार. पाणी आणि सिंचनाची सोय नसल्याचे गावकरी संतप्त. आतापर्यंत कोणीही मतदान करण्यास आले नसल्याचा मतदान केंद्र ४१ चा अहवाल.
१२: ३० PM - अमरोहा येथील भाजपच्या खासदार पदाचे उमेदवार यांनी बनावट मतदान होत असल्याचा आरोप केला आहे. बुरख्यातील महिलांची तपासणी करून त्यांची ओळख पटविली जात नाही. एक पुरुष बुरखा घालून आल्याचे मी ऐकले आहे, असे ते म्हणाले.
११: ५० AM - पश्चिम बंगालच्या रायगंज येथे मतदानादरम्यान हिंसेच्या बातम्या समोर येत आहेत. येथून सीपीएम उमेदवार मो. सलीम जखमी झाले असल्याचीही माहिती आहे. रायगंज लोकसभा क्षेत्राच्या इस्लामपूरमध्ये सलीम यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. मात्र, सलीम सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अर्धसैनिक दलाने लाठीचार्ज केला आहे.
११: ४० AM - ओडिशात महिला मतदान अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली तर मतदान केंद्राकडे जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे वाहनही पेटवण्यात आले आहे. या दोन्ही घटना ओडिशाच्या माओवादी प्रभावित कंधमाल या जिल्ह्यात घडल्या आहेत.
११: ३० AM - ११ वाजेपर्यंत विविध राज्यांतील मतदान -
उत्तर प्रदेश - ४.३१ टक्के
आसाम - २६.३९ टक्के
छत्तीसगड - २६.२ टक्के
बिहार - १८.९७ टक्के
मणिपूर - ३२.१८ टक्के
तमिळनाडू - ३०. ६२ टक्के
महाराष्ट्र - २१.४७ टक्के
जम्मू-काश्मीर - १७.८ टक्के
१०:४५ AM - जेडीएस नेते आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवे गौडा यांनी पत्नीसह मतदान केले.
१०:१५ AM - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसूर येथे मतदान केले.
१०:०५ AM - फत्तेपूर सिकरी येथील काँग्रेस उमेदवार राज बब्बर यांनी मथुरेतील राधा वल्लभ इंटर महाविद्यालय येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
९:५० AM - विविध मतदान केंद्रांवर वृद्धांनीही केले मतदान