महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

'अशी' आहे कोल्हापुरातील संस्थात्मक अलगीकरणाची कार्यपद्धती, वाचा सविस्तर...

अलगीकरणाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती देत असताना कलशेट्टी म्हणाले, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, आयसोलेशन रुग्णालय येथील तपासणी केंद्राच्या ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण केंद्रासाठी असणाऱ्या हॉटेलची यादी, त्यांचा पत्ता व भाडे याबाबत माहिती प्रदर्शित करण्यात आली.

Dr. Kalshetti
Dr. Kalshetti

By

Published : Jul 15, 2020, 7:39 PM IST

कोल्हापूर - संस्थात्मक अलगीकरणासाठी कोल्हापूर शहरातील 30 हॉटेल कार्यरत आहेत. शिवाय शासकीय अलगीकरण केंद्रसुद्धा आहेत. या ठिकाणी केसपेपर व तत्सम रेकॉर्ड याची स्वतंत्र नोंद केली जाते. शिवाय कोरोनाग्रस्त व्यक्तींचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरसुद्धा त्यांना 5 दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाते, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. संस्थात्मक अलगीकरणाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती देत असताना ते बोलत होते.

यावेळी अलगीकरणाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती देत असताना ते पुढे म्हणाले, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, आयसोलेशन रुग्णालय येथील तपासणी केंद्राच्या ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण केंद्रासाठी असणाऱ्या हॉटेलची यादी, त्यांचा पत्ता व भाडे याबाबत माहिती प्रदर्शित करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

कलशेट्टी पुढे म्हणाले, की तपासणी केंद्रातून अलगीकरणासाठी बाहेर पडणाऱ्या व्यक्ती यादीमधील हॉटेलची स्वत: निवड करून बुकिंगची खात्री झाल्यानंतर तपासणी केंद्रात हॉटेलचे नाव नोंद केले जाते. त्यानंतर संबंधित व्यक्तीला हॉटेलमध्ये पाठवले जाते. शिवाय संबंधित व्यक्ती पोहोचल्याची खातरजमा सुद्धा केली जाते.

रेड झोनमधून आलेल्या व्यक्तीचा स्वॅब घेतल्यास तिचा स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी व सचिव यांच्या मान्यतेनंतर व्यक्तीला गृह अलगीकरणासाठी सोडले जाते. पॉझिटिव्ह अहवाल आल्यास व्यक्तीला तत्काळ सीपीआरला हलविले जाते. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क व्यक्तीला दुसऱ्या खोलीत अलगीकरण केले जाते. पुन्हा 5 दिवसांनी स्वॅब तपासणी केली जाते. हॉटेल बरोबरच शासकीय केंद्रामध्ये अलगीकरण करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना परवानगी दिली जाते, असेही आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details