विश्वकरंडकाच्या इतिहासातील 'या' आहेत १० रंजक गोष्टी
नेदरलँडचे नोलान क्लार्क १९९६ च्या विश्वकरंडकात खेळणारे सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरले. यावेळी त्यांचे वय ४७ वर्ष २५७ दिवस होते.
विश्वकरंडकाच्या इतिहासातील 'या' आहेत १० रंजक गोष्टी
मुंबई - इंग्लंडमध्ये ३० मेपासून आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेला सुरुवात होत आहे. पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. यानिमित्त जाणून घेऊयात आतापर्यंत विश्वषकात झालेल्या १० रंजक गोष्टी...
- विंडीजचे क्लाइव लायड (१९७५,१०७९) आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिग (२००३, २००७) साली त्यांच्या नेतृत्वाखाली संघास विश्वकरंडक जिंकून दिला. दोनदा विश्वचषक जिंकून देणारे हे दोनच कर्णधार आहेत.
- सलग ३ विश्वकरंडक जिंकणारा ऑस्ट्रेलिया एकमेव संघ आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण पाच वेळा विश्वकरंडकावर नाव कोरले आहे.
- भारत एकमेव असा देश आहे ज्याने ६० आणि ५० षटकांच्या सामन्यात विश्वकरंडक जिंकला आहे. भारताने हा कारनामा १९८३ आणि २०११ साली केला.
- भारताचे माजी गोलंदाज चेतन शर्मा यांनी विश्वकरंडकात पहिल्यांदा हॅट्रीक साधली. त्यांनी १९८७ साली हा पराक्रम केला.
- विश्वकरंडकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने सहा विश्वकरंडक स्पर्धेत २ हजार २७८ धावा केल्या आहेत.
- न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलच्या नावावर विश्वकरंडकात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम आहे. मार्टिनने २०१५ सालीच्या विश्वकरंडकात विडिंज विरुद्ध २३७ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली होती.
- विश्वकरंडकात सर्वाधिक मोठी भागादारी रचण्याचा विक्रम ख्रिस गेल आणि मार्लोन सॅम्युल्सने केला आहे. त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध ३७२ धावांची भागीदारी रचली.
- ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राथने सर्वाधिक ७१ गडी बाद केले आहेत.
- विश्वकरंडात सर्वाधिक झेल आणि यष्टीचीत यष्टीरक्षक कुमार संगकाराने केले आहेत. झेल आणि यष्टीचीत मिळून ५४ फलंदाजांना संगकाराने माघारी धाडले आहेत.
- नेदरलँडचे नोलान क्लार्क १९९६ च्या विश्वकरंडकात खेळणारे सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरले. यावेळी त्यांचे वय ४७ वर्ष २५७ दिवस होते.