महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 9, 2019, 8:42 AM IST

ETV Bharat / briefs

बीसीसीआयची नजर केदार जाधवच्या फिटनेसवर, वेळेत फिट न झाल्यास यांपैकी एकाला मिळणार संधी

फरहार्ट यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जाधव २२ मेपर्यंत ठीक होण्याची शक्यता आहे.

केदार जाधव

मुंबई- भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याला आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. बीसीसीआय त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. केदार जाधव २३ मेपर्यंत ठीक न झाल्यास त्याच्या जागेवर दुसऱ्या राखीव खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे.


विश्वकरंडकासाठी निवडण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघात बदल करण्याची अंतिम तारीख २३ मे ही असणार आहे. केदारला मोहाली येथे मागील सामन्यात पंजाब संघाविरुद्ध खेळताना दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानात परतला नाही. त्यामुळे तो आयपीएलमधील उर्वरित सामने खेळू शकला नाही. चेन्नईचा प्रशिक्षक फ्लेमिंग म्हणाला की, केदार जाधव सध्या भारतीय संघाचे फिजियोथेरेपिस्ट पॅट्रिक फरहार्टसोबत फिटनेसवर भर देत आहे.


फरहार्ट यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जाधव २२ मेपर्यंत ठीक होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ विश्वकरंडकासाठी २२ मे रोजी रवाना होणार आहे. विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. जर जाधव वेळेत फिट न झाल्यास ऋषभ पंत, अंबाती रायुडू, अक्षर पटेल, नवदीप सैनी, इशांत शर्मा यापैकी एकाला संधी मिळू शकते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details