धुळे- शहरातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुणीही पुढे येईना, अशावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत कोरोनाबाधित व्यक्तीचे अंत्यसंस्कार पूर्ण केले आहे. तसेच, सामाजिक भान ठेवत कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी आपण पुढे यायला हवे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी केले.
धुळ्यात आरएसएस कार्यकर्त्यांकडून कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार
धुळे शहरातील प्रख्यात वकील असलेल्या व्यक्तीच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंबीय हे कोरोनाबाधित झाले. वडिलांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही, अशा वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी या कुटुंबीयांना मदत केली आहे.
धुळे शहरातील प्रख्यात वकील असलेल्या व्यक्तीच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांचे संपूर्ण कुटुंबीय हे कोरोनाबाधित झाले. वडिलांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही, अशा वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी या कुटुंबीयांना मदत केली आहे.
संघाचे स्वयंसेवक सचिन शेवतकर आणि विजय पवार यांच्या चमूने वकिलाच्या वडिलांवर विधीवत अंत्यसंस्कार केला. संघाच्या स्वयंसेवकांकडून गेल्या काही दिवसांपासून कोरोना मृतांवर कोणतेही आढेवेढे न घेता अंत्यसंस्कार केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून 10 कोरोना मृतांवर त्यांनी विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत.