महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक कायम : सोमवारी शहरात ६० रूग्णांची नोंद

नाशिक जिल्ह्याला बसलेला कोरोनाचा विळखा अजूनच घट्ट होत चालाला आहे. नाशिक शहर आणि इतर भागात सोमवारी कोरोनाचे 67 नवे रूग्ण आढळून आले. तर दिवसभरात नाशिक शहरातील 7 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद देखील झाली आहे.

nashik corona news
nashik corona news

By

Published : Jun 15, 2020, 8:30 PM IST

नाशिक - जिल्ह्याच्या ग्रामीण भागा पाठोपाठ आता नाशिक शहरातही कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. रविवारी दिवसभरात नाशिक शहरात आणि जिल्ह्यात तब्बल 103 कोरोना बाधितांची नोंद झाली होती. तर सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार नाशिक शहरात 60 तर जिल्ह्याच्या इतर भागात 7 कोरोना बाधितांची त्यांची नोंद झाली आहे. मालेगाव आणि इतर ग्रामिण भागातील संख्या घटल्याने काहीसा दिलासा मात्र मिळाला आहे.

नाशिक जिल्ह्याला बसलेला कोरोनाचा विळखा अजूनच घट्ट होत चालाला आहे. नाशिक शहर आणि इतर भागात सोमवारी 67 कोरोनाचे 67 नवे रूग्ण आढळून आले. तर दिवसभरात नाशिक शहरातील 7 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद देखील झाली आहे. सोमवारी सायंकाळी आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आजवर 2100 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यापैकी अ‌ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ही 705 एवढी आहे.

नाशिक शहरातील वाढता कोरोनाबाधितांचा आकडा नाशिक शहर प्रशासनाबरोबरच जिल्हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. नाशिक शहरातील जुने नाशिक, पंचवटी, आडगाव, पखाल रोड, सातपुर, सिडको वडाळा, दिंडोरी रोड, पेठ रोड या भागात प्रामुख्याने रुग्णांची संख्या अधिक वाढली आहे. त्यामुळे आता या भागातील नागरिकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details