महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

मुंबईत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 34 दिवसांवर

मुंबईत 12 जूनला कोरोनाचे 55 हजार 233 रुग्ण होते. त्यात आठवडाभरात वाढ होऊन 63 हजार 663 इतके रुग्ण 19 जुनला झाले. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार 1 जूनला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 18 दिवस होता. 10 जूनला हा कालावधी 25 दिवस झाला होता.

By

Published : Jun 20, 2020, 9:19 PM IST

Corona update mumbai
Corona update mumbai

मुंबई - कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असताना मुंबईमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत असल्याचे पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 34 दिवस झाला आहे. तर खार येथील एच पूर्व विभागाचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल 72 दिवसांवर गेला आहे. यामुळे काही प्रमाणात रुग्ण वाढ रोखण्यात पालिकेला यश आल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

मुंबईत 12 जूनला कोरोनाचे 55 हजार 233 रुग्ण होते. त्यात आठवडाभरात वाढ होऊन 63 हजार 663 इतके रुग्ण 19 जुनला झाले. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार 1 जूनला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 18 दिवस होता. 10 जूनला हा कालावधी 25 दिवस झाला होता. रुग्ण वाढीचा सरासरी दर 1 जूनला 3.85 टक्के होता तर 10 जूनला 2.82 टक्के होता. आज रुग्णवाढीचा दर 2.05 टक्के एवढा खाली घसरला आहे.

खार येथील पालिकेच्या एच पूर्वने आज मुसंडी मारली असून त्यांचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल 72 दिवसांवर पोहोचला आहे. या विभागात रुग्ण वाढीचा सरासरी दर फक्त 1 टक्के म्हणजेच सर्वात कमी आहे. भायखळा येथील ई विभागात हे प्रमाण 65 असून रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.1 टक्के तर दादर माटुंगा येथील एफ उत्तरमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 63 दिवस आणि रुग्ण वाढीचा सरासरी दरही 1.1 टक्के इतका आहे.

चेंबूर पूर्व येथील एम पूर्व विभागात 57 दिवस (1.2 टक्के), कुर्ला येथील एल विभागात 55 (1.3 टक्के), सॅन्डहर्स्ट रोड येथील बी विभागात 52 दिवस (1.4 टक्के) रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आहे. या तीनही विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसाहून अधिक आहे. तर एल्फिस्टन येथील जी दक्षिण विभागात 48 दिवस (1.4 टक्के), दादर येथील जी उत्तर विभागात 45 दिवस आणि चेंबूर पश्चिम येथील एम पश्चिम विभागात 45 दिवस (1.5 टक्के) इतका रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी असल्याचे पालिकेच्या आकडेवारीत नमूद केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details